जागतिक डॉक्टर दिनानिमित्त बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचा सन्मान. 

0
slider_4552

बाणेर :

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त आज बाणेर येथे सायकर क्लासिक येथे बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचा सन्मान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामांसाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि नगरसेविका ज्योती काळकर यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, डॉक्टरांप्रती आदर नेहमीच राहिला आहे. कोविड मध्ये तो जास्त वाढला आहे. डॉक्टरांनी आपल्यास कुटुंबाची व स्वतःची काळजी न घेता लोकांची सेवा केली. त्यामुळे त्यांचे निश्चितच ऋण व्यक्त केले पाहिजे. डॉक्टरांनी आपल्या कर्तव्यात कोणतीच कमतरता पडू दिली नाही. डॉक्टरांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांना मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले हॉस्पिटल उभारले गेले पाहिजे वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करावे.

याप्रसंगी डॉक्टर दिनाच्या निमित्त शुभेच्छा देताना खासदार गिरीश बापट म्हणाले, डॉक्टर हे खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करत असतात आपल्या कर्तव्य मध्ये कुठेही किंचित सुद्धा कमतरता येऊ देत नाही. शिवाय वेळेचे कोणतेही बंधन न पाळता नागरिकांची देशसेवा करतात. अशा या डॉक्टरांचा सन्मान खरं तर रोज करायला हवा. बाणेर बालेवाडी मध्ये सतत कार्यक्रम घेतले जातात ही चांगली बाब आहे. भाजपच्या नगरसेविका चांगले काम करतात म्हणून त्यांचे कौतुक करण्यास आलो आहे असे त्यांनी सांगितले. डॉक्टर हा समाजातील असा आदरणीय वर्ग आहे. त्यामुळे त्यांचे उत्साही असणे आवश्यक आहे.

यावेळी डॉक्टर राजेश देशपांडे यांनी सांगितले की, बाणेर बालेवाडी भागामध्ये डॉक्टरांनची असोसिएशन्स असून जवळपास 280 डॉक्टर समाज उपयोगी कामाकरिता कार्यरत आहे. नागरीकांना येणाऱ्या अडचाणी सोडविण्यावर प्राधान्याने असोसिएशन्स काम करते असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कळमकर यांनी तर आभार प्रल्हाद सायकर यांनी मानले यावेळी  राजेश पांडे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, शिक्षण मंडळ अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दिपक पोटे, सहकार आघाडी प्रभारी प्रकाश बालवडकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे डॉ. राजेंद्र देशपांडे, डॉ, दिनेश लोखंडे, डॉ. राजेंद्र जोशी, डॉ. धैर्यशील पाटील, उमा गाडगीळ, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, नितीन रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  पीएमपीएल ने शहरभर राबवलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद : प्रकाश बालवडकर