एका बाजूला कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना सरकारकडून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी देखील करण्यात येत आहे. असं असून देखील कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटच्या नावाने भीतीचं वातावरण तयार झालं आहे. यावर भाष्य करताना डेल्टा प्लसच्या संदर्भात जास्त चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येकाने सध्या कोरोना नियमांचं पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी व्यवहारांना गती देण्याच्या नादात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास संसर्ग केव्हाही उचल खावू शकतो.
म्हणूनच सतर्कता बाळगण्यासाठी आपण सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यात ठेवलं आहे. सर्व जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध हे पाळलेच पाहिजे, अशा सूचना आपण प्रशासनाला दिलं आहे. त्यासाठी जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.
सध्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण झाल्याचं दिसत आहे. त्यांना मी हे सांगू इच्छितो की ‘डेल्टा प्लस’च्या संदर्भात आपण दर आठवड्याला २५ नमुने अशा रितीने दर महिन्याला साधारणत: १०० नमुने घेऊन त्यांचं ‘होल जीनोम सिक्वेन्सिंग’ करत आहोत. अशा ४ हजार नमुन्यांचं आतापर्यंत ‘होल जीनोम सिक्वेन्सिंग’ आजपर्यंत झालं आहे. त्यापैकी २१ नमुने ‘डेल्टा प्लस’ पॉझिटव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, परंतु उर्वरीत सगळेजण बरे होऊ घरी परतले आहेत. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती ८० वर्षांची होती. तिला अन्यही आजार होते. त्यामुळे त्या व्यक्तीचा केवळ ‘डेल्टा प्लस’मुळेच मृत्यू झाला असं म्हणता येणार नाही.
डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अजूनही स्पष्टता आलेली नाही. ‘डेल्टा प्लस’चे देशभरात एकूण ४८ केस आहेत. त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी व्यवहारांना गती देण्याच्या नादात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास संसर्ग केव्हाही उचल खावू शकतो. म्हणूनच सतर्कता बाळगण्यासाठी आपण सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यात ठेवलं आहे. सर्व जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध हे पाळलेच पाहिजे, अशा सूचना आपण प्रशासनाला दिलं आहे. त्यासाठी जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.