पावसाचा खोटाअंदाज व्यक्त, हवामान खात्याच्या विरोधात फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवण्याची मागणी

0
slider_4552

पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेनेचे़ पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज मी शेतकरी आत्महत्या करणार नाही अभियानाचे अध्यक्ष माणिक कदम यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.

हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करीत यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर विसंबून देशातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या होत्या.त्यासाठी महागडे बियाणे खरेदी केले होते.प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही.त्यानंतरही येत्या 48 तासात पाऊस येणार 72 तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकर्‍यांना फसवत राहिले,यामागे बियाणे कंपन्या,खत आणि औषधी कंपन्यांचे आणि हवामान खात्याचे काही आर्थिक हितसंबंध असावेत अशी शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हवामान खात्याबरोबरच कृषी विभागाने देखील 17 जून नंतर पेरणीचे आवाहन केले होते. हवामान खात्याच्या विरोधात २०१७ मंतर तक्रार दाखल होण्याची ही देशातील दुसरी घटना आहे.

See also  प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचना सुनावणी अंतिम झाल्यावरच आरक्षणाचा ड्रॉ : राज्य निवडणुक आयुक्त यू.पी. एस. मदान