लॉकडाऊनमुळे आनंदाचे क्षण साजरे करु न शकलेल्या वंचित लेकींना ड्रेसचे वाटप : मयूरी बालवडकर. 

0

बालेवाडी :

गेल्या १ वर्षापासून अधिक काळापासून आपण कोरोना महामारीचा सामना करतोय. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या संकटाच्या काळात सामाजिक जाणिवेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या प्रेरणेने आणि वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात म्हणून बालेवाडी येथील भीमनगर मध्ये १०० हून अधिक गरजू मुलींना ड्रेसचे वाटप करण्यात आले.

या मुलींना ड्रेसचे वाटप उद्योजिका स्मिता समीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक समीर पाटील, प्रकाश द बालवडकर, भाजपा सदस्या मयूरी प्रणव बालवडकर, वात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा ऐडके, राज तांबोळी, चंद्रकांत पवार, संतोष लांडे, महेश पवळे, मोनिका कांबळे उपस्थित होते.ही अनोखी भेट या सर्व मुलींना आनंदाचा सुखद धक्का देणारी होती !

यावेळी भाजप सदस्या मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगीतले की, कोरोनाचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारे सण-समारंभ साजरा करता आला नाही. परिणामी त्यांच्या मुलांनाही या आनंदाच्या क्षणापासून मुकावे लागले. या लहान मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसावे या हेतूने बालेवाडी, भीमनगर येथील गरीब मुलींना देखील शिलाई खर्चा सहित ड्रेस मटेरियल देत आहोत.

यावेळी उद्योजिका स्मिता पाटील यांनी सांगितले की, निराधार महिलांना रोजगारा द्वारे आधार देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लहान मुलींना ड्रेस वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचे चांगले काम वात्सल्य फाउंडेशन करत आहेत असे त्यांनी सांगितले.

See also  बालेवाडी येथील रॉयल रणभूमीत फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार...