बालेवाडी :
आज शिवराज्यभिषेक दिन व देशाच्या एकतेसाठी आयुष्य वेचणारे विचारवंत, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राहण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचा संघर्ष आजही भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात प्रकाश बालवडकर, मयुरी प्रणव बालवडकर, उद्योजक समीर पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
या वेळी बोलताना सहकार आघाडी चे प्रभारी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांनी देशाचा एकतेसाठी वेचलेल्या आयुष्य याचा विचार करता अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचे आचरण करत, सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न आम्हीं कार्यकर्ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बाणेर व बालेवाडी परिसरातील ५० रिक्षाचालकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून उद्योजक समीर पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी १००० रुपयांच्या CNG गॅस कूपनचे वाटप करण्यात आले.
या वेळी प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, संतोष लांडे, महेश पवळे, सुभाष भोळ, संदिप बोरगावकर, दिलीप बालवडकर, संदीप बालवडकर, विजय बालवडकर, राज तांबोळी, अनुराधा ऐडके आधी मान्यवर उपस्थित होते.