औंध :
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये बर्याच जणांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फार अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत आपुलकीच्या नात्याने औंध येथील माजी स्विकृत सदस्य बाळासाहेब दत्तोबा रानवडे व औंध गाव विश्वस्त मंडळाच्या प्रथम महिला अध्यक्षा पोर्णिमा बाळासाहेब रानवडे यांच्या वतीने आज दि.१३/०६/२०२१ रोजी औंधगावातील रिक्षा चालक व रिक्षा मालक यांना २०९ रिक्षानां अन्नधान्य कीट चे वाटप करण्यात आले. तसेच ऑटो रिक्षा सॅनिटाईझ करण्यात आली. कोरोना संक्रमण काळात वेळ वेळी बाळासाहेब रानवडे यांस कडून गरजूंना विविध पद्धतीने मदत करण्यात येत आहे. तसेच प्रभागातील जिथे जिथे आवश्यक आहे अशा ठिकाणी मोफत सॅनिटाईझ करून दिले जात आहे.
यावेळी माजी स्वीकृत सदस्य बाळासाहेब रानवडे यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, कोरोना च्या वाईट परिस्थिती मध्ये बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा वाईट परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी व आपुलकीचा ठेवा म्हणून रिक्षा चालक व मालक यांना छोटीशी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी उपस्थित सचिन वाडेकर, हेमंत पांचाळ, सुनिल माने, औंध गाव कुस्ती केंद्राचे वस्ताद पैलवान विकास रानवडे, सुप्रीम चोंधे, हारुण सवार, निशांत झुंरगे, दत्तात्रय रानवडे, संतोष गुजर, राजेश रानवडे, कुकी गरेवाल, अजित रानवडे, गोरखनाथ पंडरो, संदेश रानवडे, मिलिंद रानवडे, राजेंद्र रानवडे, व समस्त औंध गाव ग्रामस्थ उपस्थित होते.