बाणेर :
बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने आज संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या आजी माजी संचालक ज्यांचे १ व २ जून ला वाढदिवस येतात, अशा रामदास विधाते, राम गायकवाड, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, बाबुराव विधाते, लहू सायकर, ॲड सुदाम मुरकुटे, पांडुरंग गोळे, बाळासाहेब पिंजन या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून अपघात झलेल्या आकाश भोसले यांना ११००० रू मदत करण्यात आली. तसेच गिरीधर हॉटेल चे मालक आनंद बिष्णोई यांच्या वतीने बाणेर गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यासाठी ११००० रू चा चेक स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रल्हाद सायकर यांना देण्यात आला.
या वेळी बोलताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी बोलतांना सांगितले की, पतसंस्थेचे काम करत असताना सहकार क्षेत्रातील आजी-माजी संचालकांनी नेहमीच मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे आज सगळ्यांचा वाढदिवस एकत्रित साजरा करताना एक वेगळा आनंद मिळत आहे. सगळ्यांना आरोग्संपन्न आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी सदिच्छा व्यक्त केली.
या वेळी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी वेगळ्या पध्दतीने सामजिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. व ते नेहमी गोरगरिबांसाठी मदतीला धावत असतात असे, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे यांनी सांगितले. तर माजी नगरसेवक शिवाजी बांगर यांनी सांगितले की, डॉ. दिलीप मुरकुटे हे नेहमी सगळ्यांना एकत्र घेवुन काम करतात. बाणेर गावात प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने बांधणारे व्यक्तिमत्व डॉ. मुरकुटे यांचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रल्हाद सायकर, बाळासाहेब भांडे, संजय ताम्हाणे, ॲड. दिलीप शेलार, राजू शेडगे, ॲड पांडुरंग थोरवे, गणेश मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.