पुणे :
सध्या कोव्हिडच्या आपत्ती प्रसंगी पुणे शहरात व्हेंटिलेटर चा गरज लक्षात येताच शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री, युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक मदतीतून आरोग्य व्यवस्थेत हातभार लागावा या भावनेतून पुणे शहरासाठी दहा तर पिंपरी चिंचवड साठी पाच व्हेंटिलेटर पाठवले आहे.
ही मदत आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मेर्लेकर व पुणे शहर संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या कडे करण्यात आली.
या वेळी संजय मोरे(शहर प्रमुख), पृथ्वीराज सुतार (शिवसेना,गटनेते पुणे मनपा), गजानन धरकुडे, विजय देशमुख, विशाल धनवडे(नगरसेवक), पल्लवी जावळे(नगरसेविका), प्राची आल्हाट, संगीता ठोसर, उल्हास शेवाळे(उपशहर प्रमुख), प्रविण डोंगरे, राहुल जेटके, युवराज पारखे आदी उपस्थित होते.
प्राथमिक स्तरावर ही मदत अनेकांना उपयोगी ठरेल आणि लवकरच या महामारीच्या संकटातून आपण बाहेर येऊ विश्वास आदित्य ठाकरेंच्या वतिने या प्रसंगी रविंद्र मेर्लेकर यांनी व्यक्त केला.