औंध मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांची मागणी.

0

औंध :

सद्या कोरोना महामारीमुळे सगळेच अडचणीत आहे. त्यातच पुण्यातील स्मार्ट म्हणवल्या जाणाऱ्या औंध येथे प्रत्यक्षात मुळा नदीजवळील परिस्थिती पाहीली असता असे निदर्शनास येते की, नदीमध्ये दूषित पाणी सोडले गेल्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. नदीचा पूर्ण परिसर जलपर्णी ने व्यापला आहे. नदी परिसर पाहिला असता त्या परिसरात दुर्गंधी असल्याचे जाणवते. खूप मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झालेली दिसते. त्यामुळे औंध गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या ठिकाणावरील दूषित पाणी नदीपात्रात जाणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत मा. महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी मॅकन्यूजशी बोलतांना सांगितले की, स्थानिक महिला प्रतिनिधींनीचे दुर्लक्ष केल्यामुळे नदी परिसर अस्वच्छ झालेला आहे. त्याचे वाईट परिणाम औंध गावातील नागरिकांना भोगावे लागतात ही फार मोठी खंत आहे. स्वतः पुण्याचे महापौर असताना औंध परिसर सुंदर व स्वच्छ कसा बनेल याकडे नेहमीच लक्ष दिले होते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथे होणारी दुर्गंधी त्वरित थांबवावी. यासाठी नदी मधील जलपर्णी काढून नदीचा परीसर स्वच्छ करावा याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.

दिवसेंदिवस अधिकच अस्वच्छता या भागांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाअसून, डेंगू, मलेरिया सारखे आजारांना सुरुवात होत आहे. औंध पुणे शहराचे प्रवेशद्वार असून त्यामुळे ह्या परिसराकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घातले पाहिजे. नदीतील जलपर्णी काढून नदी जवळचा परिसर, घाट परिसर स्वच्छ करावा. नदीला पाणी आहे हे दिसले पाहिजे.या संदर्भात लवकरच महानगरपालिका आयुक्त पुणे यांच्याशी भेट घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मा. महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

See also  योग्य नियोजनबद्ध कामामुळे योगीराज पतसंस्थेला नफा : ज्ञानेश्वर तापकीर