बाणेर – बालेवाडी मधील नागरिकांना कोरोना तून सुरक्षित राहण्यासाठी स्टीम वैपरायझर वाटप : भाजपचे प्रकाश बालवडकर यांचा उपक्रम.

0

बाणेर – बालेवाडी :

कोरोनामुळे सगळे भयभीत असून प्रत्येकाला आपल्या सुरक्षिततेची काळजी आहे. अशा या कोरोनाच्या महामारी नागरिकांसाठी एक आपुलकीची सेवा भाजपा सहकार आघाडी पुणे शहरचे प्रकाश बालवडकर व भाजपा सदस्या मयुरी प्रणव बालवडकर यांच्या संकल्पनेतून बाणेर – बालेवाडी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्टीम वैपरायझर / वाफेचे मशिन वाटप करण्यात आले. आज सदाफुली सोसायटी, सेलिब्रेशन सोसायटी, भीम नगर बालेवाडी, कम्फर्ट झोन, डीएसके गंधकोष, वेल वेल्थ पॅराडाईज सोसायटी येथे 2000 वाफेच्या च्या मशीनचे वाटप होणार असून आज जवळपास 1000 मशीन वाटण्यात येणार आहे.

या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना आहे म्हणून घाबरून न जाता त्याच्यावर उपाय योजना करायला हव्यात. काळजी घेणे हा चांगला उपाय असुन त्याकरिता घरगुती पद्धतीने उपाय योजना राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे काढा घेणे, वाफ घेणे हे अतिशय सोपे मार्ग आहे त्यामुळे कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. भाजप सहकार आघाडीचे प्रकाश बालवडकर यांनी नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी वाफेचे मशीन देण्याची एक चांगली योजना राबवली आहे.

यावेळी प्रास्ताविक करताना मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही नेहमीच बांधिल आहोत. सगळ्यांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला वाफ घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या साठी जी काही मदत करायची गरज लागेल ती सर्व मदत आम्ही करू.

यावेळी प्रकाश बालवडकर यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, कोरोना हा आजार घातक असून त्यापासून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वाफेचे मशीन वाटप करण्याची योजना राबवत आहोत. नागरिकांनी याचा वापर करून स्वतःची काळजी घ्यावी.

याप्रसंगी आयोजक प्रकाश बालवडकर, मयुरी प्रणव बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, मण्डलअध्यक्ष पूनित जोशी, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, शिवम बालवडकर, किरण धेंडे, प्रभाग अध्यक्ष उमा गाडगीळ, मोनिका कांबळे, सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी, ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस - म्हाळुंगे ग्रामस्थांची नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी घेतली बैठक.