औंधगाव :
शिवकालीन पूर्व औंधगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे, रविवार दि. १६ मे २०२१ रोजी सालाबाद प्रमाणे होणारा ” ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ” कोरोना महामारी मुळे ” शासकीय नियमांचे पालन करून, रितसर पोलीस परवानगी घेवून मोजके औंधगाव विश्वस्त मंडळ संचालक व मोजके ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत, सकाळी भैरवनाथ महाराज यांची महापूजा ॲड. अशोक रानवडे पाटील यांचे हस्ते आणि पालखीची भैरवनाथ महाराजांची ” एकच मंदिर प्रदक्षिणा ” घेवून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.
स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष योगेश जुनवणे, पदाधिकारी हेरंब कलापुरे, गिरीश जुनवणे व इतर सर्व विश्वस्त मंडळाचे संचालक यांनी यशस्वी रित्या मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या कोरोना नियमांचे पालन करून देवाचा उत्सव यशस्वी रित्या पार पाडला. विश्वस्त मंडळाने वर्गणीसाठी स्कॅनर च्या माध्यमातून ऑनलाईन वर्गणी गोळा केली जमा झालेली वर्गणी कोराना रुग्णासाठी देण्यात येणार आहे. औंधगाव ग्रामस्थांचे योग्य प्रकारे उत्सवासाठी सहकार्य मिळाले.
करोनाचा वाढता संसर्ग आणि वर्षेन वर्ष चालत आलेले उत्सवाची परंपरा या दोन्हीचा समतोल राखत उत्सव साधे पणाने साजरा करण्याचा प्रयत्न केला. या मध्ये प्रशासनाचा आणि ग्रामस्थचे चांगले सहकार्य लाभले याबद्दल मी सर्वाचे आभारी आहे असे औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष योगेश जुनवणे यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले.