कोरोनाची लस घ्यायची असल्यास आधार कार्ड अनिर्वाय नाही : युआयडीएआय

0

युआयडीएआय कडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनाची लस घ्यायची असल्यास आधार कार्ड अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. युआयडीएआयने असे म्हटले की आधार कार्ड नसले तरीही कोरोनाची लस मिळण्यापासून दूर राहू शकत नाहीत. या व्यतिरिक्त एका विधानात असे म्हटले की, जर आधार कार्ड नसेल तर कोणत्याही रुग्णाला औषध, रुग्णालयात दाखल करुन घेणे किंवा उपचार करण्यासंबंधित नाकारु शकत नाही.

आधार कार्डसाठी एक्सेप्शन हँडलिंग मॅकेनिज्म स्थापित केले असून 12 अंकाच्या बायोमॅट्रिक आयडीच्या अभावात सुविधा आणि सर्विसची डिलिव्हरी ठरवण्यासाठी याचे पालन केले पाहिजे. युआयडीएआय यांनी पुढे असे म्हटले की, कोणत्याही व्यक्तिला तुम्ही गरजेचे सामान यासाठी देत नाहीत की त्याच्याकडे आधार कार्ड नाही आहे.तर त्यांच्यासाठी आधार हे कारण बनले नाही पाहिजे. आधार कार्डाशिवाय सुद्धा महत्वाचे काम आणि सुविधेचा वापर केला जाऊ शकतो.

देशात कोरोना व्हायरसच्या महासंकटात युआडीएआय यांनी केलेले विधान महत्वपूर्ण आहे. जर एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास किंवा कोणत्या कारणास्तव आधार ऑनलाईन वेरिफिकेशन यशस्वी न झाल्यास या संबंधित एजेंसी विभागाला आधार अधिनिय, 2016 मधील निर्धारित विशिष्ट मानदंडानुसार सेवा द्यावी लागेल.

तर भारतामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड यांच्यासोबतीने आता स्फुटनिक वी ही तिसरी लसदेखील उपलब्ध झाली आहे. 14 मे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या स्फुटनिक वी लसीच्या 2 खेपी भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेशातील Kasauli येथील Central Drugs Laboratory कडून परवानगी मिळाल्यानंतर आजपासून ही लस नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या मर्यादित साठा असल्याने ही लस मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. हैदराबाद मध्ये डॉ. रेड्डीज लॅबचे Global Head of Custom Pharma Services, दिपक सप्रा यांना ही पहिली लस देण्यात आली आहे.

See also  हा आहे जगातला सगळ्यात स्वस्त पेट्रोल असणारा देश ! जिथे १.४६ पैसै लिटर मिळते पेट्रोल.