बालेवाडी :
बालेवाडी येथील स्मशान भूमी ची दुरावस्था झाली आहे. त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक दिवसापासून स्मशनभूमीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना येथे अंत्य विधीसाठी येण्याकरता अडचणी निर्माण होत आहे. अशाच एका दशक्रिया विधी साठी नगरसेवक बाबुराव चांदेरे हे बालेवाडी स्मशनभूमीतील दुरावस्था पाहून व्यथित झाले. त्यांनी तात्काळ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या हि बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ स्मशानभूमीत साफसफाई करून घेतली.
यावेळी डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी स्मशनभूमीतील दुरावस्था निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कार्यकर्ते व कर्मचारी यांना सोबत घेवुन साफसफाई केली गेली. प्रशासनाचे लक्ष घालून स्मशान भूमी ची निगा राखली जावी याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे.
या वेळी मॅक न्यूज शी बोलताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, डॉ. सागर बालवडकर तसेच नाना बालवडकर, कर्मचारी व कार्यकर्त्यांसह स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला. त्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी केले. हि वेळ राजकारण करण्याची नाही परंतु महानगर पालिकेच्या माध्यमातून स्मशानाच्या जागेची नीट व्यवस्था राखली जात नाही. वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही. पालिकेतील भाजपाच्या सत्ते मध्ये कंत्राटी कामगार यांचे पगार वेळेवर होत नाही. म्हणून दिवसेंदिवस येथील दुरावस्थेत वाढ होत आहे.