पुण्यातील, तसेच देशातील पहिले ‘चाईल्ड कोविड केअर सेंटर’, येरवड्यात : रूबल अग्रवाल

0
slider_4552

पुणे :

महामारीच्या दुसऱ्या लाटेचा पुणे जिल्ह्याला देखील फटका बसला असून, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, काल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील महामारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.

दरम्यान, या बैठकीनंतर पुणे महापालिका सावध झाली असून महापालिकेने, येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या आणि चालू महामारीच्या परिस्थितीच्या धर्तीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. महामारीच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असणारा सर्वात मोठा धोका लक्षात घेऊन महापालिकेने, देशातील पहिलं ‘चाईल्ड कोविड केअर सेंटर’ उभं करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील, तसेच देशातील हे पहिले ‘चाईल्ड कोविड केअर सेंटर’, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात उभारलं जाणार असून, या ठिकाणी २०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. तसेच, यासाठी ४ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, येत्या दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.

दुसरीकडे, तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यासोबत औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे, तर नागपूर आणि ठाण्यात देखील प्रत्येकी १००-१०० बेडचं रूग्णालय उभारण्यात येणार आहे.

See also  पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकाचं एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी