बालेवाडी प्रतिनिधी:
छत्तीसगढ प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी छबिंद्र कर्मा यांनी बालेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांची भेट घेत महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची माहिती घेतली.
यावेळी जनरल सेक्रेटरी छत्तीसगड प्रदेश काँग्रेस छबिंद्र कर्मा , स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, भुमाता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर, हनुमंत बालवडकर, संदीप बालवडकर, दिलीप बालवडकर, सोमनाथ शिंदे, संपत टकले, बाळासाहेब बालवडकर, मच्छिंद्र बालवडकर, दत्ता बालवडकर आदी उपस्थित होते.