पुणे :
कोविडग्रस्त रुग्णाच्या काही दुर्दैवी घटना अनुभवल्यानंतर तसेच माझ्या COVID- 19 ग्रस्त मित्रांना मदत केल्यानंतर. मी त्यांच्या प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी निराशेने हताशेने भरलेले चेहरे पाहिले होते. दरम्यान मला कळले की कोविड -19 च्या या साथीच्या रोगात, कोविड -19 च्या रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी प्लाझ्मा सहजतेने मिळावा मिळावा म्हणून एक एप्लीकेशन बनवायचे ठरवले, अशी माहिती आनिस सय्यद यांनी दिली. अनिस या तरुणाने प्लाझ्मा घेणाऱ्या व देणाऱ्यांसाठी प्लाझ्मा फाईंडर हे ॲप्लिकेशन तयार केले आहे.
महाराष्ट्रात सध्या ८ लाख लोक हे करोना मुक्त आहेत. पण या लोकां मध्ये जागृती नाहीये पण प्लाझ्मा थेरपी बाबत खूप गैरसमज आहेत .तसेच प्लाझ्मा दाता व रुग्ण यात समन्वय नाहीये, हे दूर करण्यासाठी हे अँप विकसित करण्यात आले आहे. या अँप द्वारे जवळील दाता यांचा फोन क्रमांक मिळेल. ही प्रक्रिया मात्र दोन्ही बाजूनी घडणार आहे. प्लाझ्मा दात्यांनी याठिकाणी याठिकाणी जास्तीत जास्त माहिती देऊन रजिस्टर करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या परिसरातील रुग्णाला लवकरात लवकर प्लाझ्मा मिळण्यास मदत होईल.
प्लाझ्मा दान ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. १८ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्तीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे़ तसेच त्याचे हिमोग्लोबीन १२़. ५ पेक्षा जास्त आहे, अशी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. जिल्ह्यातील जे नागरीक कोरोनामुक्त झाले आहे. त्यांनी अथवा त्यांच्या परिचित ज्या व्यक्तीला कोवीड विषाणूचा संसर्ग झाला होता व त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आव्हानही प्लाझ्मा फाईंडर टीमच्या वतीने करण्यात आला आहे. सध्या या ॲप्लिकेशनचा काही प्रमाणात फायदाही नागरिकांना होत आहे. जास्तीत जास्त प्लाझ्मा देणाऱ्या लोकांनी रजिस्टर केल्यास त्याचा फायदा अनेकांना होईल.
ॲपची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये :
सुलभ नोंदणी प्रक्रिया, प्लाझ्मा शोधणारे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करु शकतात. ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइलद्वारे लॉगिन करुन आपले प्रोफाइल भरू शकतो.
प्लास्मा शोधणारा प्रोफाईल योग्य रक्तगट काही सोप्या क्लिकसह अपडेट करून संपर्क करू शकतात . ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, फोन क्रमांक इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन कौशल्ये आणि इतर माहिती तो भरु शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाईल सर्व लोकांना दिसतील.
प्लाझ्माची गरज असणारे लोक आपले रक्तगट च्या पसंतीनुसार संबंधित प्लाझ्मा शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.
नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य आहे.
अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध आहे :
https://play.google.com/store/apps/details?id=com.plasma.finder.online