आयटी कंपनी टीसीएस ला कोरोना काळातही नफा 

0

नवी दिल्लीः

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएस ने  कोरोनानंतरच्या काळात 15 टक्के नफा कमावलाय. मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 14.9 टक्क्यांनी वाढून 9246 कोटी रुपये झाला. खरं तर कोरोना काळात डिजिटल सेवांच्या मागणीत मोठी वाढ झालीय, त्याचा फायदा कंपनीला झालाय. निव्वळ नफ्याव्यतिरिक्त कंपनीच्या महसुलातही वाढ झालीय. या काळात कंपनीच्या महसुलात 9.4 टक्के वाढ नोंदली गेली असून, ती 43,705 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या नफ्यानंतर कंपनीने भागधारकांना 15 रुपये अंतिम लाभांश देण्याची घोषणा केलीय.

असा वाढला नफा

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हापासून देशात डिजिटल सेवांमध्ये बरीच वाढ झालीय. टीसीएसला डिजिटल सेवेच्या भरभराटीचा फायदा झाला. मार्च तिमाहीत कंपनीचे एकत्रित ऑपरेटिंग मार्जिन मागील तिमाहीच्या तुलनेत 2 बेसिस पॉइंटने वाढून 26.8 टक्क्यांवर पोहोचले. एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीच्या तुलनेत हे 170 बेसिस पॉईंट जास्त होते. कंपनीचा नफा अधिक चांगला होईल, अशी बाजारातील तज्ज्ञांची अपेक्षा होती. निकालापूर्वी कंपनीच्या समभागात घट झाली. सोमवारच्या व्यापार सत्रात टीसीएस समभाग 2.17 टक्क्यांच्या तोट्यावर बंद झाला होता.

व्यवस्थापन कामगिरीवर समाधानी

कोरोनानंतरही कंपनीचे व्यवस्थापन कंपनीच्या अशा कामगिरीने समाधानी आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओओ एन गणपती यांनी बीएसई फायलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीने महसूल आणि मार्जिन फ्रंटवर वित्त वर्ष 2021 मध्ये चांगली कामगिरी केली. या व्यतिरिक्त या तिमाहीत कंपनीला 9.2 अब्ज डॉलर्सचा सौदा देखील झाला, जो कोणत्याही तिमाहीच्या ऑर्डरच्या बाबतीत सर्वाधिक आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात टीसीएसचा एकत्रित महसूल 4.6 टक्क्यांनी वाढून 1.6 लाख कोटी रुपये झाला आणि नफा 33,388 कोटी झाला.

See also  नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक केली आयोजित , शिवसेना करणार आरक्षण मुद्दा उपस्थित : संजय राऊत