धक्कादायक : साताऱ्यात कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयाबाहेर रिक्षातच लावला ऑक्‍सिजन!

0
slider_4552

सातारा :

सातारा जिल्ह्यातील वडूज ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने एका कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयाबाहेर रिक्षात ऑक्‍सिजन लावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्‍यात आरोग्य विभागाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या घटनेचा एक फोट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला रिक्षात बसली असून तीच्या हातात ऑक्सिजनचा पाईप आहे. बाजूला ऑस्किजन सिलिंडर दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील एक 75 वर्षीय वृद्ध महिला सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान कोरोना चाचणीसाठी वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात आली होती.

तपासणीनंतर ती कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपासणी केली असता तिच्या ऑक्‍सिजची पातळी प्रमाणापेक्षा कमी होती. ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. ते सोमवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार होते; परंतु त्यासाठी आवश्‍यक डॉक्‍टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी उपलब्ध न झाल्याने ते सुरू होऊ शकले नाही.

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू असून, तेथे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची गर्दी होती. त्यामुळे त्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाच्या बाहेर एका रिक्षात ऑक्‍सिजन लावायची वेळ आली.

See also  एस एस सी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज.