भाईजी क्रिकेट चषक सनी बालवडकर स्पोर्ट क्लब ने पटकवला… 

0

औंध प्रतिनिधी :

माजी केंद्रीय कृषीमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण माननीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  विशाल विधाते सोशल फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  प्रभाग क्रमांक ९ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे (भाईजी चषक)बक्षिस वितरण समारंभ माजी स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक पुणे महानगरपालिका बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते झाले. भाईजी चषक सनी बालवडकर स्पोर्ट क्लब ने पटकवला व शिवम बालवडकर स्पोर्ट क्लब ने उपविजेतेपद  व तृतीय क्रमांक राजाभाऊ लोखंडे मित्र परिवार यांनी पटकावले.

बाबुराव विधाते, देवीदास मुरकुटे , राजेंद्र मुरकुटे , विजय विधाते , तुकाराम विधाते , रामदास विधाते , विश्वास मुरकुटे , नितीन कळमकर, शेखर सायकर , माणिक गांधीले, सुनिल विधाते, प्रल्हाद मुरकुटे, नंदकुमार विधाते, भगवान विधाते, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, जंगल रनवरे, संतोष विधाते, रामदास धनकुडे, राजाभाऊ कळमकर, समिर चांदेरे, प्राजक्ता ताम्हाणे, सुषमा ताम्हाणे, जितेंद्र विधाते, विशाल विधाते सोशल फौडेशन चे सर्व कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते. या स्पर्धा स्व. सुधीर यशवंत विधाते क्रीडानगरी, विधाते वस्ती येथे झाल्या.

See also  औंध बोपोडी प्रभागात सुनील माने यांच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेचे शिबिर सुरू