पाषाण परीसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या कडून सोसायट्या मध्ये मोफत सॅनिटायझर ची फवारणी.

0

पाषाण :

करोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सर्वच जण भयभीत आहे. अशा परिस्थिती मध्ये मुख्यतः सोसायट्या मध्ये करोनाचे प्रमाण वाढत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता माजी नगरसेवक चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वर वाडी, सुसरोड या परिसरातील विविध सोसायट्या मध्ये जावून सॅनिटायझर ची फवारणी केली जात आहे.

यावेळी सनी निम्हण यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, महापालिका सर्व सोसायट्या पर्यंत जावून सॅनिटायझर ची फवारणी व्यवस्थित करू शकणार नाही. सामजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने सर्व सोसायट्या मध्ये सॅनिटायझर ची फवारणी मोफत केली जाणार आहे. करोना च्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टिने ज्या सोसायट्या मध्ये सॅनिटायझर ची फवारणी करायची आहे त्यांनी 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान निम्हण यांनी केले आहे.

या वेळी सहदेव अवेन्यू, निकाश स्काईस, गोल्डन गॅलेक्सी, सोमेश्वर पार्क, श्रीनिकेतन सोसायटी, प्रथमेश पार्क, शिवम सोसायटी, अष्टविनायक अँगल, अष्टविनायक प्रसाद, राणे क्लासिक, अवंती हाईट, श्रीवरंजन टावर, सुप्रिया संकुल बाणेर, संध्या नगर आदी  सोसायट्या मध्ये आतापर्यंत सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘सॅनिटाईझ विथ सनी’ अभियानाअंतर्गत आमच्या सोसायटीचे सॅनिटायझेशन करण्यात आले. कोरोना संक्रमण काळात हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सनी निम्हण हे संकटसमयी नेहमीच नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हा अनुभव परत एकदा आला.  नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, त्याबद्दल नागरिक त्यांचे आभार मानत आहे. या उपक्रमास नागरिकांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

 

See also  बाणेर येथील शिवसेनेच्या वतीने कष्टकरी महिलांचा सन्मान.