रिलायन्स विरुद्ध लोकशासन आंदोलनाचा न्याय मागण्यासाठी लढा अधिक जोमात

0
slider_4552

रिलायन्स विरुद्ध गेली पस्तीस वर्ष रेंगाळलेला लढा न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली नव्या उमेदीने उभा राहिला आहे. लोकशासन आंदोलन सर्व आंदोलनकर्त्यां मध्ये लढण्याची जिद्द निर्माण केली आहे त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार द्यायची नाही अशा भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहेत .

ठीकठिकाणच्या संघटनांचा आंदोलनास वाढता पाठिंबा पाहता आंदोलनास अधिक धार निर्माण झाली आहे . लोकशासन आंदोलनाचे सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत त्यामुळे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे

रात्री थंडीची हुडहुडी सहन करीत असताना चौदा आणि पंधराव्या दिवशी मुसळधार पडणाऱ्या पावसाला न जुमानता आंदोलनकर्ते आपल्या न्याय मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनापासून तसूभरही ढळलेले नाहीत. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिस यंत्रणे व्यतिरिक्त रिलायन्सचे व्यवस्थापन आणि सरकारी प्रशासन ढुंकूनही या आंदोलनाकडे बघत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी रणरागिणीचा अवतार आता धारण केला असून रिलायन्स व्यवस्थापनाबाबत त्या जाहीर निषेध करीत आहेत.

 

 

See also  नव्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम : राज्य निवडणूक आयुक्त