औंध एम्स हॉस्पिटल मधील लसीकरणामुळे नागरिकांना दिलासा.

0
slider_4552

औंध :

औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण अविरत सुरू आहे. 2 मार्च ला लासिकरणासाठी परवानगी मिळाल्या नंतर प्रत्यक्षात 3 मार्च पासून लसीकरण करण्यास सुरुवात झाली. सलग तेरा तारखेपर्यंत कोव्हिशील्ड चे लसीकरण सुरू होते. दररोज किमान चारशे ते पाचशे लोकांना लसीकरण केले जात होते. त्यानंतर कोव्हॅक्सीन उपलब्ध झाल्यामुळे त्याचे डोस देण्यात आले. या लसीकरणामुळे एम्स हॉस्पिटल ने नागरिकांना एक दिलासा दिला आहे.

एम्स हॉस्पिटल मध्ये सद्या लसीकरण डोस उपलब्धतेनुसार जवळ पास 200 लस दररोज दिल्या जातात. जो डोस पहिल्यांदा दिला आहे तोच डोस दुसऱ्या वेळी दिला जाणार आहे. हॉस्पिटल मध्ये लसीकरण करताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा व्यवस्थापनाने करून दिल्यामुळे नागरीकांना लसीकरण करता येत आहे. जवळ पास आतापर्यंत ४३०० कोव्हिशील्ड लसीकरण व १३०० कोव्हॅक्सीन लसीकरण केले गेले आहे. आज पर्यंत लसीकरण करताना कोणालाही त्रास झालेला नाही नाही.

नागरीकांना लसीकरण करतेवेळी सर्व वयोवृध्द नागरीकांना लसीकरण सुविधा प्राप्त व्हावी याकरिता स्वतः माजी महापौर दत्तात्रय गायकवाड कार्यरत असून ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात. लसीकरणाचे १५० रूपये आणि १०० रुपये नर्सिंग चार्ज असे नाममात्र २५० रुपये लसीकरण करण्यासाठी घेतले जातात. तसेच नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहे. हॉस्पिटल कडून सुलक्षणा कातोरे आणि अनिरुद्ध सप्रे हे अतीशय नियोजन पद्धतीने महापौर दत्तात्रय गायकवाड व व्यवस्थापकीय संचालक गोकुळ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लसिकरण मोहिम राबवत आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थापनाकडून रजिस्ट्रेशन करून दिले जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळें ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित लासिकरण केले जात आहे.

यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे लसिकरण करता यावे यासाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. लसीकरण झाल्यानंतर नागरीक निर्भिड होवून सुरक्षित आनंदात जात आहे. त्यामुळे ऐक सामाजिक बांधिलकी जपल्याचा आनंद आम्हाला मिळत आहे. कोविड विरुद्ध लढण्याकरिता एम्स हॉस्पिटलमध्ये लसीकरण केले जाते ही अभिमानास्पद बाब आहे. लसीकरण सुरक्षित असुन नागरिकांनी लसीकरण करण्यास यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

See also  योगीराज पतसंस्थेच्या वतीने विविध संघटनाच्या नव नियुक्त पदाधिका-यांचा सत्कार 

एम्स हॉस्पिटल चे व्यवस्थापकीय संचालक गोकुळ गायकवाड यांनी सांगितले की, हॉस्पिटल कर्मचारी नागरिकांचे सुरक्षिततेची व्यवस्थित खबरदारी घेऊन नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन करत आहे. हॉस्पिटल नेहमीच सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेत असते, प्रथम जेष्ठ नागरिक आणि नंतर ४५ ते ५९ वय असणाऱ्या नागरीकांना लसीकरण केले जाते, असे त्यांनी मॅकन्यूज शी बोलताना सांगितले.