मराठा क्रांती मोर्चा झाला ‘आक्रमक ‘;१४ व १५ तारखेला आझाद मैदानावर करणार उपोषण

0

पुणे : प्रतिनिधी :-

मराठा क्रांती मोर्चाच्या दि १० डिसेंबर रोजी झालेल्या झूम मिटिंग(VC) मध्ये उपस्थित १००च्यावर समन्वयकांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णया नुसार सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. त्या अगोदर ठरल्या प्रमाणे १ व २ तारखेला राज्यात ठिकठिकाणी SEBC उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महावितरण समोर आंदोलन केलेले आहे .

कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागेल.आझाद मैदान येथे दि १४ व १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदरचे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ESBC व SEBC मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत.

या उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न,सारथी संस्था गतिमान करणे ,अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला ,मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित केसेस मागे घेणे,यांसह इतर मागण्या सोडविण्यासाठी विधिमंडळातील आमदारांनी सदरचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत असे आवाहन सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी आझाद मैदान येथे आंदोलक मराठा विद्यर्थ्यांना पाठिंब्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे तो पर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पुढील आंदोलनाच्या जनजागृती साठी व न्यायालयीन लढ्यात देखील सर्वानी सहभागी होऊन व आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.हे प्रश्न सुटले नाही तर पुन्हा पुन्हा छोटी छोटी आंदोलने करण्यापेक्षा पुन्हा एकदा मोठ्या ताकतीने समाजाला एकसंघ करून आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी सर्वांनी आगामी आंदोलन व्यापक व अभूतपूर्व करावे लागेल.

अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसेल तर सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला निवेदन देणार आहे

See also  एस एस सी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज.