पालिकेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत.

0

पुणे :

पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत. काही दिवसांपुर्वी मीरा भाईंदर येथील केशव सृष्टी स्व.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पार पडलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले होते.

दरम्यान नवी दिल्ली येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महविद्यालयाच्या उभारणी संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, जायका जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी भेटी घेत फडणवीस यांनी पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे मेट्रो इत्यादी रखडलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा देखील त्यांनी वेळोवेळी केला आहे.

पुण्याला आवश्यक पाणी पुरवठा धरणातून व्हावा , अरुंद रस्ते रुंद व्हावेत यासह फेरीवाले, पथारीवाले यांचे पुनर्वसन , बेकायदेशीर बांधकामांचे उभे राहत असलेले उपनगरांमधील मोठ्ठे जाळे,आंबील ओढ्याला नेहमी येणारा पूर, बेरोजगारी, महापालिकेत होणारी कंत्राटी स्वरूपाची तुटपुंज्या पगारावरील नौकर भरती आणि रिक्त असलेली असंख्य पदे, महापालिकेत टेंडरच्या होणाऱ्या ‘रिंग्स’ अशा विविध प्रश्नांनी महापालिकेला वेढलेले आहे. आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना ५ वर्षात केलेली कामगिरी जनतेपुढे घेऊन भाजपला जायचे आहे. या पार्श्वभूमीवर या शेवटच्या वर्षात आता भरारी घेण्याच्या उद्देशाने फडणवीस यांची भेट महत्वपूर्ण ठरू शकणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात खासदार गिरीष बापट, कोथरूडचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कसबा विधानसभा मतदरसंघाच्या आमदार मुक्ता टिळक, पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ, पुणे कँटोन्मेंट विधानसभेचे आमदार सुनिल कांबळे आणि खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर तसेच पुणे महापालिकेत 98 नगरसेवकांचं संख्याबळ आहे.

See also  भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होतोय : अजित पवार