कात्रज :
कात्रज संतोषनगर येथील न्यू साईनकर ज्वेलर्स या प्रसिद्ध दागिन्यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे उद्घाटन बारामती च्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी कैलास साईनकर यांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मराठी ऐतिहासिक चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी मांगडे यांची उपस्थिती होती. या चित्रपटासाठी लागणारी सर्व ऐतिहासिक शैलीतील दागिने साईनकर ज्वेलर्स यांनीच तयार केली आहेत्.
उद्घाटन सोहळ्याला माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका कल्पना थोरवे, सुवर्णा सरवदे, डॉ. सुनील जगताप, तसेच कात्रज परिसरातील अनेक मान्यवर नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईनकर ज्वेलर्स गेली 30 वर्षे ग्राहकांच्या विश्वासाला आणि गुणवत्तेला प्राधान्य देत कात्रज परिसरात यशस्वीपणे कार्यरत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती साईनकर आणि राहुल साईनकर यांनी प्रयत्न केले. तसेच सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या सोहळ्याने केवळ एका दालनाच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, एक सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व असलेला क्षण अनुभवण्याची संधी कात्रजवासीयांना दिली.