औंध :
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट करून 28 जणांची हत्या केली त्याच्या निषेधार्थ आज औंध परिहार चौकात ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या नेतृत्वात 365 कलम 370 व 35A कलम काढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात तेथे विकासाची गंगा सुरू झाली. काश्मीरचा चेहरा मोहरा बदलतोय आणि काश्मीरमध्ये पर्यटन परमोच्च बिंदूवर पोहोचले आहे. तेथे गेलं तीन चार वर्षात शांतता नांदत असून स्थानिकांचा व्यवसाय बहरलेला आहे. ह्याच पोटदुखीतून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भय निर्माण करण्यासाठी नॉन मुस्लिम विशेषतः हिंदू पर्यटकांवर हा भ्याड हल्ला केलेला आहे.
याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सडेतोड आणि पाकिस्तानच्या कायम स्मरणात राहील असे उत्तर दिले जाणार आहे, अशी ग्वाही ॲड. मुसळे यांनी नागरिकांना दिली. यावेळी नागरिकांनीही निषेध करीत आपला सडतोड उत्तर देण्याबाबत मनोगत व्यक्त केले.