बाणेर :
हनुमान जयंती निमित्त बाणेर मध्ये बगाड उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला. शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा असलेली बगाड यात्रा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर गावाच्या श्रद्धेचा, एकतेचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे.
हजारो भाविक ग्रामस्थ या सोहळ्यास उपस्थित होते,बगाड उत्सवाची सुरुवात बाणेर गावातील श्री भैरवनाथ मंदिर येथून झाली वाजत गाजत कपिल मल्हार सोसायटी समोर भंडारा खोबऱ्याची उधळण करुन बगाडचे रिंगण पार पडले.
हजारो नागरिक या वेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाणेर ग्रामस्थ व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.