विजेच्या लपंडावामुळे औंध,बोपोडी भागातील नागरिकांचे जीवन विस्कळीत…

0
slider_4552

औंध :

औंध रोड, चीखलवाडी, बोपोडी परिसर पूर्ण भागातील विद्युत पुरवठा कालच्या अवकाळी पावसामुळे तब्बल पाच ते सात तास खंडित झालेली होती. भयंकर गरमी, त्यात अवकाळी झालेला पाऊस यामुळे परिसरातील नागरिकांचे खूप हाल झालेले दिसून आले.

विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असून वीज नसल्यामुळे अभ्यासात व्यत्यय निर्माण झालेला होता. माता भगिनींना स्वयंपाक करणे देखील असह्य होवून गेले. स्थानिक मनसे शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे हे वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत होते.

पावसानंतरची पूर्ण परिस्थिती पाहता असे निदर्शनास आले की बोपोडी महावितरण शाखेकडे अवकाळी एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर विद्युत पुरवठया बाबत काहीच उपाययोजना नाही. याचा आम्ही मनसे शाखे तर्फे तीव्र निषेध करतो व भविष्यात पुन्हा अशी निष्क्रियता दिसून आल्यास महावितरण कंपनीला मनसेच्या खळखट्याक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्थानिक मनसे शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे यांनी दिला.

 

See also  औंध येथील घरफोडी करून पसार झालेल्या मुख्य गुन्हेगाराला अटक.