अखेर औंध येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाची माघार… क्रिडा शुल्क ऐच्छिक करण्याची पालकांची मागणी पूर्ण. 

0
slider_4552

औंध :

औंध येथील सीटी इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कुठलीही कल्पना न देता क्रिडा शुल्क अनिवार्य केल्याच्या विरोधात पालकांनी एकत्र येत शाळेसमोर आंदोलन केले होते.अखेर शाळा प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करत शुल्क अनिवार्य ऐवजी ऐच्छिक केल्याने पालकांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

या शुल्काविरोधात पालकांच्या वतीने भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव सौरभ कुंडलीक व शहर उपाध्यक्ष सागर परदेशी यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे व शिक्षणमंत्र्यापर्यंत याचा पाठपुरावा केला. शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे शाळेने फी वाढ केल्याच्या प्रकाराबद्दल तक्रार केली.तसेच सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.यानंतर फी ऐच्छिक करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.

अखेर शाळा प्रशासनाने आपला फी लादण्याचा निर्णय माघारी घेत क्रीडा शुल्क अनिवार्य न करता ऐच्छिक केले. तसा मेल ही शाळेकडून सर्व पालकांना पाठवण्यात आला आहे.

See also  भाजप विरुद्ध महा विकास आघाडी क्रिकेट सामन्यांमध्ये भाजपचा निसटता संघर्षमय विजय....