बालेवाडी येथील (विद्युत उपकेंद्र) सबस्टेशनचे काम लवकर सुरू करण्याचे फडणवीस यांना दिले निवेदन…

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी सर्वे नंबर चार येथील (विद्युत उपकेंद्र) सबस्टेशनचे काम लवकर सुरू करण्याची मागणी माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाणेर बालेवाडी परिसरामध्ये जाणवत असलेल्या विद्युत समस्येबाबत काही दिवसापूर्वी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याने बालेवाडी येथील सर्वे नंबर ४ येथील 60 आर जागा ( विद्युत उपकेंद्र ) सबस्टेशन साठी महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाला देण्यात आले आहे. परंतु जागा उपलब्ध होऊन देखील त्या ठिकाणी काम चालू होण्यास उशीर होत आहे. याची दखल घेत माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू करावे असे निवेदनाद्वारे दिले. देवेंद्र फडणवीस हेच ऊर्जामंत्री असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे सब स्टेशनचे काम मार्गी लावावे अशी विनंती निवेदनाद्वारे कळमकर यांनी केली.

या निवेदनाला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिनांक २४ रोजी बालेवाडी येथील सबस्टेशनचे काम लवकरात लवकर चालू करावे अश्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे ही कळमकर यांनी सांगितले.

बाणेर बालेवाडी परिसर झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी अनेक मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. तसेच अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या देखील या परिसरामध्ये चालू आहेत. पुणे शहरातील एक स्मार्ट परिसर म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. परंतु वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत व याचा परिणाम या परिसरातील व्यावसायिकांवर होत आहे. त्यामुळे हे विद्युत सबस्टेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.

हे सबस्टेशन तयार झाल्यास बाणेर बालेवाडी परिसरातील किमान 25 वर्षासाठी तरी विद्युत खंडित होण्याची समस्या संपणार आहे. या सबस्टेशनचे काम सुरू झाले तरी हे सब स्टेशन पूर्ण चालू होण्यास किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी उलटणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू व्हावे असा प्रयत्न आहे, असे माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी सांगितले.

See also  शिवनगर येथील नवरात्री उत्सवाला सुरवात..