प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार …

0
slider_4552

पुणे :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा डाॅ गजानन एकबोटे, बेहेराम खोडाईजी, ग्रुप सी ई ओ रुबी हाॅल क्लिनिक,  डाॅ. सायमन ग्रांट, विश्वस्त, रुबी हाॅल क्लिनिक, प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह, पी ई सोसायटी,
डाॅ जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह पी ई सोसायटी, डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, पी ई सोसायटी हे उपस्थित होते.

सामजंस्य करार करण्यामागची भुमिका स्पष्ट करताना डाॅ गजानन एकबोटे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सगळ्यांना व्हायला हवा. चांगल्या अरोग्यापासुन कुणीही वंचित राहू नये. हा करार जरी दोन वर्षाचा असला तरी हा दिर्घ काळासाठी होईल असे मला वाटते.
हा करार नावजलेल्या हेल्थ केअर संस्थेचा एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेशी झालेला आहे. ही संस्थेच्या ९१ वर्षाच्या कालावधीतील एक सुवर्णक्षण आहे असे डाॅ. एकबोटे म्हणाले.

रुबी हाॅल क्लिनिकचे प्रेझेंटेशन देताना डाॅ सायमन ग्रांट म्हणाले रुबी हाॅलमधे नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान वापरून रूग्णांना सेवा दिली जाते. मनोगत व्यक्त करताना डाॅ बेहेराम खोडाईजी यांनी रुबी हाॅल क्लिनीकची संपुर्ण माहिती दिली. फाउंडेशनच्या चारही युनीटमधे सर्वांना चांगली सेवा मिळेल अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी डाॅ समीर सोनार, डायरेक्टर, न्युक्लिअर मेडिसीन,
डाॅ अंजली केळकर, एच ओ डी,लॅब डाॅ प्रणव महादेवकर, डायरेक्टर, रेडिओलाॅजी, डाॅ सुशील या्दव,  बाॅबी जाॅन, यांचा सत्कार करण्यात आला.

या कराराचा लाभ संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नियामक मंडळाचे सर्व सदस्य, आजिवन मंडळाचे सदस्य, कर्मचार्यांवर अवलंबुन कुटुंबीय व सर्व विद्यार्थी यांना सगळ्या लॅब सुविधा (पॅथाॅलाॅजी), सर्व लॅब चाचण्या तसेच सी टी स्लॅब, एम आर आय अशा डायग्नोस्टीक सुविधा व न्युक्लिअर मेडिसीन हे सवलतीच्या दरात करता येईल.
पी ई सोसायटीचे विद्यार्थी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय, पी ई सोसाटीचे मेंबर्स या सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
डाॅ पी के ग्रांट यांनी या प्रसंगी आपल्या शुभेच्छा दिल्या. डाॅ गायत्री एकबोटे, डाॅ दिग्विजय एकबोटे यांचा या करारात महत्वाचा सहभाग आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

See also  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना भारतरत्न मिळावा

हा करार करणारी हि एकमेव संस्था आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ निवेदिता एकबोटे यांनी केले. प्रस्तावना डाॅ जोत्स्ना एकबोटे यांनी केली. गणेशवंदना व पसायदान सौ स्वाती पटवर्धन यांनी केले.
आभार प्रदर्शन प्रा शामकांत देशमुख यांनी केले.