बाणेर :
महादेवाचे जेथे जेथे शिवलिंग आहेत ते शिवलिंग आपल्याला ध्यानाकडे नेतात. आपल्या जीवनाला महत्त्व श्वासामुळे आहे. श्वासाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. त्यावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा. श्वासाचा ध्यान जर तुम्ही एक तास केले तर पाच तास जप केल्यासारखे आहे. त्यामुळे श्वासाचे महत्त्व ओळखा व त्यावर लक्ष केंद्रित केले तर आपले जीवन सफल होईल, असे मत प.पु. उंबरगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
बाणेर येथील श्री बाणेश्वर देवस्थान पांडवकालीन गुफा मंदिरातील शिवलिंग स्थापना प्राण प्रतिष्ठापना प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वामीभक्त बाळासाहेब ठोंबरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, डॉ. दिलीप मुरकुटे, अशोक मुरकुटे, गणेश कळमकर, पुनम विधाते, बाणेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भुजबळ, संदीप वाडकर, सुधीर कळमकर, गणेश तापकीर, योगेश कळमकर, राहुल पारखे, संदीप ताम्हने, प्रल्हाद सायकर, श्रीकांत बनकर, विशाल विधाते आदी उपस्थित होते.
बाणेश्वर देवस्थान ट्रस्ट शिवलिंग स्थापना प्राण प्रतिष्ठापना निमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये कलश पूजन, जलहरी पूजन, शिवलिंग ग्राम परिक्रमा, भजन, होम हवन आदी कार्यक्रम घेण्यात आले. या ऐतिहासिक शिव मंदिरातील शिवलिंगाची स्थापना ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केली. लाखो भक्तांना महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी आता दर्शनाचा लाभ घ्यायचा येणार असून, विविध कार्यक्रमही महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आले आहेत.