श्री बाणेश्वर मंदिर शिवलिंग प्राण प्रतिष्ठेला सुरुवात…

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील श्री बाणेश्वर देवस्थान पांडवकालीन गुफा येथील मंदिरातील शिवलिंग स्थापना प्राण प्रतिष्ठेला सुरुवात झाली असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम देवस्थान ट्रस्टच्या वतीने ठेवण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी प्राण प्रतिष्ठा होणार असून विविध धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली आहे.

विविध धार्मिक विधी मध्ये कलश पूजन १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. तर आज २० फेब्रुवारी रोजी जलहरी पूजन दुपारी १२ ते ५ वा. व शिवलिंग ग्राम परिक्रमा सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

शिवलिंग प्राण प्रतिष्ठा

स्वागत मिरवणूक व शिवलिंग प्राण प्रतिष्ठा स्थापना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. प्राण प्रतिष्ठा प. पु. स्वामी उंबरगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे . याप्रसंगी सन्माननीय उपस्थिती मध्ये स्वामी भक्त बाळासाहेब ठोंबरे व प्रमुख उपस्थिती उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाणेश्वर सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून जास्तीत जास्त भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याची आव्हान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने पीडीसीसी बँक संचालक पदी निवड झालेल्या संचालकांचा सत्कार...!