नियतकालिक ‘कलाईडोस्कोप’ चा सतरावा अंक प्रकाशित..

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे नियतकालिक ‘कलाईडोस्कोप’ याचा सतरावा अंक नुकताच प्रकाशित झाला. या अंकाची मुख्य थीम ‘सायकॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी: ‘फ्रेंड्स और फोज’ अशी होती. यामधे विद्यार्थ्यांनी या नियतकालिकामध्ये इंग्रजी व मराठी मध्ये लेखन केले. त्यामध्ये लेख व कविता यांचा समावेश आहे.

नियतकालिक काढण्या मागची भूमिका विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य तसंच निर्मिती क्षमता वाढवणे ही आहे. काही विद्यार्थी सातत्याने तीन व पाच वर्ष लिहीत राहतात आणि त्यामुळे त्यांचा लिहिण्यातला आत्मविश्वासही वाढतो. या नियतकालिका करता विविध प्रकारचे विषय या आधी हाताळले गेले आहेत. जसं की ‘लाईफ इज ब्युटीफूल , इज लाईफ ब्युटीफूल? ‘हंड्रेड इयर्स ऑफ सायकॉलॉजी” व्यसनाधीनता’  ‘Tabbos किंवा निशिद्ध गोष्टी’ इत्यादी.

नियतकालिकाचे मुखपृष्ठ विद्यार्थ्यांनी डिझाईन केले आहे. तसेच प्रकाशन सोहळ्याच्या नियोजनामध्ये सुद्धा ते सहभागी होतात. या उपक्रमाची मूळ संकल्पना आणि विस्तार हा मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. साधना नातू यांनी केला. प्रा. नाशोम क्रास्टो, प्रा. मानसी देशपांडे, प्रा. नेहा कोल्हटकर प्रा. संचिता सूर्यवंशी यांनी नियोजनामध्ये हातभार लावला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांचे मार्गदर्शन नियतकालिकाला व प्रकाशन सोहळ्याला सातत्याने मिळत राहिले आहे. कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. ज्योती गगनग्रास यांचाही या उपक्रमाला कायमच पाठिंबा असतो. प्रकाशन सोहळ्याकरता प्रमुख अतिथी फ्लेम विद्यापीठाच्या डॉ. शलाका शहा होत्या. त्यांनी सायकॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी या विषयावर आपले विचार मांडले. प्रकाशन सोहळ्याकरता विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

See also  प्रत्येक नगरसेवकाला बेंचेस, बाके, कचऱ्यासाठी बकेट व अन्य कामासाठी पिशव्या खरेदी साठी १० लाखाचा निधी