मॉडर्न महाविद्यालय विद्यार्थिनींची पंतप्रधान रॅली (आर डी परेड) साठी निवड.

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथिल मॉडर्न महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली गोल्डन सिनियर अंडर ऑफिसर प्राची संतोष पवार या विद्यार्थिनीची प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात ‘ ऑल इंडिया कंटीजंट कमांडर ऑफ गर्ल्स ‘कंटीजंट पंतप्रधान रॅली मध्ये म्हणून निवड झाली आहे. ती पुर्ण भारतीय एन सी सी मुलींचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करणार आहे. आई योगिता आणि वडील संतोष पवार यांना ही बातमी ऐकून कौतुकाची थाप देऊन तिला पंतप्रधान रॅलीसाठी दिल्ली येथे पाठविले.

तसेच महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली दुसरी विद्यार्थीनी गोल्डन सिनियर अंडर ऑफिसर धनश्री रामलाल चौधरी या विद्यार्थिनीची निवड फ्लॅग एरिया आणि कल्चरल परेड साठी पंतप्रधान रॅली मधे निवड झाली आहे. आई लीला आणि वडील  रामलाल यांनी मुलीची मुलीची अभिमानास्पद कामगिरी पाहून खूप आनंद झाला आहे

यांची निवड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन यांच्या अंतर्गत झाली आहे. राष्ट्रीय छात्र सेना चे कमंडींग ऑफिसर कर्नल व्ही. के. मल, पुणे ग्रुप कमांडर प्रमुख ब्रिगेडियर अर्जुन मीत्रा, मेजर येशू मुदगल व महाविद्यालयाचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. प्रतिभा राव यांचे मार्गदर्शन व सल्ला दोघींना मिळाला. प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी दोघींचे अभिनंदन केले.

See also  मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात : देवेंद्र फडणवीस