पुणे :
सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत चाललं आहे. त्यामुळे अनेक आजारांना आपल्याला वारंवार समोरं जावं लागत आहे. हॉस्पिटलचा खर्च देखील सर्वसामान्य लोकांना परडवत नाही. यासाठीच जिल्ह्यात एव्हाना शहरात अनेक आरोग्य शिबीर भरवले जातात. अशातच पुणेकरांसाठी येत्या २४ ते २५ जानेवारी रोजी भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांनी मोफत ‘अटलसेवा महाआरोग्य’ शिबीर आयोजित केले आहे.
अटलसेवा महाआरोग्य शिबीर २४ व २५ जानेवारी रोजी सकाळी ०९ : ३० वाजेपासून सायंकाळी ०५ : ०० वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या अटल सेवा महाआरोग्य शिबीरासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ६० नामांकित हॉस्पिटल आणि तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. यात कॅन्सरवरील जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे ख्यातनाम डॉक्टर्सही देखील येणार आहेत.
शिबीरामध्ये मैमोग्राम, बायोप्सी, अनुवंशिक परीक्षण, ट्यूमर प्रोफ़ाइलिंग टेस्ट, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरील महागड्या चाचण्या तसेच केमो थेरेपी, रेडिएशन थेरेपी आणि शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत. त्यामुळे या शिबीरासाठी सर्वांनी भेट देऊन आपल्या आरोग्याची मोफत तपासणी आणि उपचार करून घ्यावे, असे आवाहन लहू बालवडकर यांनी केले आहे.