औंध :
औंध डि.पी.रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती करा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016साली स्मार्टसिटी अंतर्गत उद्घाटन केलेला झोपडपट्टी SRA प्रकल्प 500 स्क्वे.फूट स्मार्ट नवीन सुविधायुक्त घरे द्यावीत अशी मागणी केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर नेते रमेश ठोसर यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार जनसंपर्क अभियानात मागणी केली.
औंध डि.पी.रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत झोपडपट्टीचे पुणे शहरातील देशातले पहिलं मॉडेल म्हणून 2016साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हाळुंगे येथील स्टेडियम येथे प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन केले होते. आज 9 वर्षे उलटून गेली तरी काम रखडलेले आहे. औंध भागात स्मार्ट सिटीतील रस्ते, फुटपाथ, मोठमोठे केलेले आहेत.
स्मार्ट सिटीतील झोपडपट्टी कोंबड्यांच्या खुराड्यासारखी न बांधता ५०० चौरस फूटाचे बांधकाम, बाल्कनी असलेली, पिण्याच्या पाण्याचे २४ तास उत्तम व्यवस्था असावी, सौरऊर्जा मार्फत सुध्दा वीज व्यवस्था असावी, उद्यान, लायब्ररी, नवीन होणारी इमारत ६ मजली असावी. तसेच झोपडपट्टी शेजारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती करावा.,असे मागण्यांचे निवेदन केंद्रीयमंत्री,व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना रमेश ठोसर नेते रिपाई पुणे शहर यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळ आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक आनंद छाजेड उपस्तिथ होते. अभिमान शिंदे, निलेश ठोसर, अदित्य औचार, उमेश ठोसर इत्यादी कार्यकर्त्यांनी समक्ष भेटून मागण्यांचे निवेदन दिले .