इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याच्या दृष्टीने वाचन व प्रवास महत्वाचा – डॉ. आशुतोष जावडेकर 

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथिल मॉडर्न कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे महाराष्ट्र सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आयोजित “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” साजरा करण्यात येत आहे.

इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याच्या दृष्टीने प्रवास महत्वाचा आहे, तसेच तो माणसाला आतून बाहेरून बदलून टाकतो असे मत लेखक, गायक , युट्युबर तसेच व्यवसायाने दंतवैदक असेलेल्या डॉ. आशुतोष जावडेकर यांनी मांडले.

या कार्यक्रमाची सुरवात १ जानेवारी रोजी सामुहिक वाचन करुन करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन केले. यानंतर पुस्तक परिक्षणाची स्पर्धा घेण्यात आली.आवडणार्या पुस्तकांचे वाचन करुन त्याचे परिक्षण करुन ते सर्वांनी अपलोड केलेले आहेत. याचे परिक्षण होऊन याचे निकाल २६ जानेवारी रोजी जाहिर केले जातील.

याचबरोबर वाचन संकल्पा अंतर्गत पुस्तक कसे वाचले पाहिजे” वाचन कौशल्य” या विषयावर

एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जीवन कौशल्य म्हणून वाचन या विषयावर माहिती सांगण्यात आली. मॉडर्न कॉलेजमधील शिक्षक, ग्रंथपाल आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. नवनाथ तुपे उपस्थित होते. तसेच या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे डॉ. नवनाथ तुपे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

डाॅ तुपे यांनी वाचन व समालोचनात्मक वाचन कसे करावे या विषयावर चर्चा केली.

वाचन संस्कार करताना वाचन कसे करावे? का करावे? कसे वाचावे? वाचून त्याचे आकलन कसे होते व त्याचे रुपांतर स्मरणशक्तीत कसे होते? अकलनक्षमता कशी वाढावी याचे मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी दोन उपक्रम राबविले व वाचनांक कसा काढतात याचे प्रत्यक्षिक दाखविले.वाचनांक कसा कमी असेल तर तो कसा वाढवावा यावर विस्तृत चर्चा केली.

See also  पुण्यातील एका बड्या नेत्याच्या मध्यस्थीने बालन यांना तात्पुरता दिलासा…

याच कार्यक्रमा अंतर्गत पुस्तक प्रदर्शन व विक्रिचे आयोजित केले गेले. यामधे विविध प्रकाशक व पुस्तक विक्रेते यांनी सहभाग घेतला. यावेळी अध्यात्मा पासून ते पर्यटनावर ची देशीविदेशी लेखकांची पुस्तके उपलब्ध होती.

याच दरम्यान द ग्रेट ईंडियन बुक टुर या दोन दिवसीय कार्यक्रमामधे कविता, वाचन,लेखन, भाषा या विषयावरील चर्चा मान्यवर लेखकांबरोबर आयोजित केली होती.

लेखक राहुल काळे,  वैभव सबनीस, महेश बजाज, सफिर भोला, सोनाली रसाळ, किर्ती चंगलानी,अलीशा जी आणि  रोहित कोठारी या लोकप्रिय लेखकांनी विद्यार्थ्यांशी पुस्तकांविषयी , वाचनाविषयी संवाद साधुन त्यांच्या मनात वाचनाविषयी कुतुहल तयार केले.

हा संपुर्ण कार्यक्रम भाषा विषयाचे प्राध्यापक डाॅ संदीप सानप , डाॅ संस्कृती अवलगावकर, डाॅ अनुराधा रौंदळे यांनी आयोजित केला. याला ग्रंथपाल डाॅ संगिता ढमढेरे-राव यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालय जिल्हास्तरीय समन्वयक म्हणून काम करत असल्याने त्यांचे उपक्रम इतर संस्थाना मार्गदर्शक ठरत आहेत.