बाणेर :
आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अतुल्य भारत हा विषय घेऊन संपन्न झाला. यावेळी पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला काश्मीर ते कन्याकुमारी सर्व राज्यांची माहिती लहान मुलांनी नृत्याद्वारे सादर केले. यावेळी अगदी दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचा या नृत्य कार्यक्रमात सहभाग होता. तसेच स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि एकविसाव्या शतकातला भारत यामध्ये किती अमुलाग्र बदल झाला आहे, याचे दर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या नाटिकाद्वारे तसेच नृत्यद्वारे घडविले. यावेळी अगदी पूर्वापार चालत आलेली शेतीची पद्धत आणि आजची आधुनिक विकसित शेती पद्धत कशी आहे हे देखील मुलांनी नृत्यद्वारे सादर केले. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे शिक्षण क्षेत्र अगदी गुरुकुल पद्धती पासून तर आजच्या डिजिटल शिक्षण पद्धती कशी आहे हे मुलांनी नाटिकेद्वारे आणि नृत्यद्वारे दाखवून दिले.
आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला भारत कसा असेल याचे दर्शन या मुलांनी नृत्यद्वारे सादर केले. आज आपला भारत देश जगाच्या पाठीवर प्रगल्भ देश म्हणून विकसित देश म्हणून पुढे येत आहे यामध्ये टुरिझम क्षेत्र असू देत की खेळामध्ये देखील पूर्वीच्या काळी अगदी लिंगोरच्या, कबड्डी, खो-खो ,ते आजच्या क्रिकेट, फुटबॉल असू देत की हॉकी असू देत या सगळ्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी सुंदर रित्या सादर केले
भारत वैद्यकीय क्षेत्रात अतिशय प्रगत देश आहे आयुर्वेदापासून ते आजच्या अलोपाथीपर्यंत भारताने औषध निर्मितीमध्ये तसेच कित्येक आजारांवर कशा पद्धतीने मात केली याचे प्रदर्शन देखील मुलांनी नृत्यद्वारे सादर केले यामध्ये कोविड काळामध्ये आयुर्वेदाचा कसा उपयोग झाला आणि नरेंद्र मोदी यांनी लोकांना जो शांततेचा संदेश दिला हा देखील मुलांच्या नृत्यद्वारे सादर झाला.
कोविड चा काळ अतिशय कठीण काळ होता प्रत्येक नागरिकासाठी पण या काळात देखील ज्या धीराने सामोरे गेले आणि आयुर्वेदाने यावर कशी मात केली याचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले . त्याचप्रमाणे आपल्या भारताची संस्कृती प्रत्येक राज्यात असलेलीं विविध भाषा असून देखील जे एकतेचे प्रतीक आहे ती एकता मुलांच्या नृत्यातून दिसली .आज टेक्नॉलॉजी मध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. स्वतंत्र्यापूर्वीचा भारत टेक्नॉलॉजी मध्ये इतर देशांच्या मानाने खूप मागे होता पण आज चंद्रयान मंगलयान मोहीम सफलतेने पार पाडणारा भारत एक देश ठरला आहे आणि याचे सादरीकरण विद्यार्थ्याने अतिशय सुंदर रित्या केले.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आज आपण बघितले तर भारतासारखा सुंदर आणि प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या कलाकृतीने विविधतेने नटलेला हा देश आहे आणि यासाठी अतुल्य भारत या संकल्पनेतून जी भारताची छबी प्रत्येक देशासमोर आली आहे ती अतिशय सुंदर आहे अजिंठा वेरूळ असू देत की विविध मंदिरे असू देत ती हजारो वर्षांपूर्वीची सुंदर कलाकृती कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे. याचप्रमाणे भारतामध्ये जितके प्रांत आहेत त्या प्रत्येक प्रांताची राहण्याची पद्धत किंवा त्यांच्या सांस्कृतिक पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि हे ही सांस्कृतिक आणि हे वेगळेपण कसे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. भारत अतिशय सुंदर आहे आणि त्याची संस्कृती देखील तितकीच वाखाणण्याजोगी आहे हे मुलांनी नृत्यद्वारे दाखवून दिले. याबरोबर भारत देश हा औद्योगिक क्षेत्रात देखील प्रगत देश म्हणून ओळखला जातो आणि याचे पूर्वीच्या काळात भारत देशामध्ये जे औद्योगिक औद्योगीकरण झाले आणि आजच्या काळातले औद्योगीकरण याचे सुंदर प्रदर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.
याचबरोबर आज शिक्षण क्षेत्रामध्ये पुरुषांनी इतक्याच महिला देखील कार्यरत आहे. उत्तम प्रतीचे शिक्षण घेऊन महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आणि याचे प्रदर्शन पुरुष आणि स्त्री हे सर्व क्षेत्रांमध्ये बरोबरीने कशा पद्धतीने काम करतात. याचे प्रदर्शन देखील विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यद्वारे दाखवून दिले. याचप्रमाणे आपला भारत संपूर्ण जगामध्ये आज तिसऱ्या क्रमांकावर आहे याचे कारण ग्लोबलायझेशन आज भारतामध्ये अतिशय समर्थपणे कार्य होत आहे. आणि याचेच उदाहरण म्हणजे भारत आज जगाच्या नकाशावर एक उच्च पतीचे स्थान निर्माण करू शकला आणि ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचे 25 विद्यार्थी ज्यांची आयआयटी साठी निवड करण्यात निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्युनिअर कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचे आयआयटीमध्ये सिलेक्शन झाले त्यांचा देखील सत्कार करण्यात आलां तसेच दहा विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय तसेच राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये जे विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. दहावी आणि बारावी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे अशा विद्यार्थ्यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्कार देखील पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी प्रथम सत्र मध्ये जालन्याची आमदार अजून खोतकर एचएससी बोर्डच्या महाराष्ट्र एचएससी बोर्डच्या डायरेक्टर अनुराधा ओक, जालन्याचे प्रसिद्ध वकील हरिभाऊ जोल आदेसाहेब आरटीओ कमिशनर वसई, नील प्रसाद चव्हाण साहेब डेप्युटी डायरेक्टर बारामती त्याचप्रमाणे द्वितीय सत्र मध्ये एच एस सी बोर्डाचे चेअरमन गोसावी साहेब उपस्थित होते. तसेच तृतीय सत्रामध्ये मुळशीचे आमदार शंकर शेठ मांडेकर उद्योजक सुशील अग्रवाल उपस्थित होते. यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल नाना धनकुडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. केलेली प्रगती आणि विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण याचे विशेष कौतुक या पाहुण्यांनी आपल्या भाषणाद्वारे केले. यावेळी यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थी व पालकांना लाभले कार्यक्रमाची सांगता संस्थेचे खजिनदार राहुल धनकुडे यांनी सर्वांचे आभार मानून केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंत्री महोदय सर्व पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील आभार राहुल धनकुडे यांनी मानले