पुणे :
मनसेचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे विभाग उपाध्यक्ष गौरव खेडेकर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे अवचीत्य साधून साधारण ४०० दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप केले.
सामाजिक क्षेत्रात गौरव खेडेकर हे लहानपणा पासून सामाजिक रित्या सक्रिय आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्या माध्यमातून सध्या विविध उपक्रम राबवत असून याचा फायदा नागरिकांना होत आहे, असे शाखा अध्यक्ष अभिजित लाड यांनी सांगितले. यावेळी शुभम देसाई, हृतिक फर्नांडिस, करण जनार्धन आदी उपस्थित होते.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी केलेल्या सामाजिक कामाचा आपल्या पक्षाला फायदा कसा होईल याकडे लक्ष देऊन सध्या कामे सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेला भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल जेने करुन आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचू या साठी नेहमी ते तत्पर राहणार असल्याचे मत यावेळी गौरव खेडेकर यांनी मांडले.