आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या जनसंवादामध्ये पिंपळे नीलख येथील स्मशानभूमी परिसर सुधारण्याचा विषय उपस्थित.

0
slider_4552

पिंपरी चिंचवड:

आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या जनसंवादामध्ये पिंपळे नीलख येथील स्मशानभूमी परिसर सुधारण्याचा विषय उपस्थित. 7 दिवसात काम मार्गी लावण्याचे स्थापत्त्य विभागाचे आश्वासन.

गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड प्रभागातील पिंपळे निलख येथील स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे हा विषय आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रवीराज काळे यांनी महापालिकेच्या जनसंवादामध्ये उपस्थित केला.

खरं तर खूप वर्षांपासून स्मशान भूमी परिसराची सुधारणा करणे हे काम प्रलबीत आहे परंतु कोणीही याकडे लक्ष देत नव्हते.पर्यायाने अनेक वर्षांपासून स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे हे काम जैसे थेच होते.

परंतु आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी पिंपळे निलख स्मशानभूमीचा परिसर सुधारणा करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कंपाउंड, तसेच भव्य दिव्य अशी कमान आणि सुरक्षा रक्षकांना बसण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी महानगरपालिकेच्या जनसंवादात उपस्थित केल्यावर त्यावर तात्काळ कार्यवाही करून 7 दिवसात काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन महापालिकेच्या ड प्रभागातील स्थापत्त्य विभागाने दिले.

त्यामुळे लवकरच पिंपळे निलख ग्रामस्थांची ही मागणी आता आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागणार असून पिंपळे निलख येथील स्मशानभूमी परिसर सुधारणा काम मार्गी लागणार आहे.

See also  डॉ. हेमंत देवकुळे यांना कर्करोगावरील उपचाराच्या उपकरणाचे पेटंट