गुरुदेव दत्त जन्म सोहळ्यानिमित्त औंध येथे भव्य रक्तदान शिबीर

0
slider_4552

औंध :

गुरुदेव दत्त जन्म सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या सोहळ्याला पिंपरी चिंचवड ब्लड सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले.

या सोहळ्याला दत्त भक्त आणि औंध गावांतील तरुण आणि महिला यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .या निमित्ताने प्रमुख उपस्थिती सनी निम्हण, अँड मधुकर मुसळे नगरसेविका अर्चना मुसळे मनसे नेते रणजित शिरोळे,नाना वाळके औंध गाव ह.भ.प सोमनाथ बोर्ड, ह.भ.प.अमित क्षिरसागर, मनसे विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, दत्ता रणदिवे विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे,  विश्वस्त महेंद्र, जुनवणे किरण लांडगे बरेच मान्यवर उपस्थित होते.

११६ दत्त भक्त परिवारातर्फे रक्तदान करण्यात आले, पुढे भविष्यात यांच्या मार्फत आरोग्य शिबीर आणि विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घ्यायचा मानस आहे.सूर्य मुखी दत्त मंदिर अध्यक्ष अँड सतिश रानवडे यांनी याचे आयोजन केले होते . तसेच या रक्तदान शिबिराचे संपूर्ण नियोजन मनसे नेते निलेश जुनवणे यांनी केले तसेच त्यांना अभिषेक जेऊर यांचे सहकार्य लाभले.

See also  सचिन मानवतकर यांच्यातर्फे औंध येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा भेट..