पुणे :
गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यशाकडे झेप घेतली आहे. दर्पण रोकडे जकार्ता मध्ये संशोधन सहाय्यक तर श्रीकांत जनकवडेचे CA च्या परीक्षेत भरीव यश.
गणेशखिंड येथिल मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर, आपले परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर घवघवीत यश मिळवत यशस्वी होण्याकडे मार्गक्रमण केले आले. द्वितीय वर्ष BSc–कॉम्पुटर सायन्स मध्ये शिकत असलेल्या दर्पण एकनाथ रोकडे इंडोनेशियातील तरुमंगारा विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून रुजू झाला. या विद्यापीठातील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम करेल.
तर वाणिज्य शाखेतील श्रीकांत चंद्रशेखर जनकवडे या विद्यार्थ्याने सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या CA इंटरमिजीएट ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा ५० व्या श्रेणीसह (RANK) उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले. नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून येत शेतकरी कुटुंबातील श्रीकांतने अथक परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे पालक, शिक्षक आनंद व्यक्त करत आहेत.