पुणे :
गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या उद्योजकता विकास केंद्रातर्फे ‘उद्योजक व्हा’ ही PM-USHA(राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा विभाग) RUSA(राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) व IIC यांनी हि कार्यशाळा आयोजित केली.
लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती उपप्राचार्या व समन्वयक डॉ शुभांगी जोशी यांनी दिली.
प्राचार्य डॉ संजय खरात पीएम-उषा योजनेबद्दल बोलताताना म्हणाले’ मॉडर्न कॉलेजला 5 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. हे महाराष्ट्रातील 43 महाविद्यालयांना दिले जाते आणि पुणे जिल्ह्यातील आमचे एकमेव महाविद्यालय आहे.’
संजय आवटे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, ‘उद्योजक हे जन्माला येत नसून बनतात. या प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे उद्योजकांची वृत्ती विकसित होऊ शकते. विद्यार्थी व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत हे मनोरंजक आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.’ डाॅ ज्योती गगनग्रास, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. विनय कुमार, संशोधनाचे उपप्राचार्य आणि पीएम – यूएसएचे समन्वयक, डॉ. संगीता ढमढेरे, आयआयसी आणि एचओडीच्या समन्वयक, प्रा पराग शहा आयक्युएसी समन्वयक उपस्थित होते.
पुढील सत्रामधे डाॅ गुरुराज डांगरे असिस्टंट प्रोफेसर, प्रतिभा काॅलेज
यांनी उद्योजकता व मानसिकता यावर व्याख्यान दिले तर सीए अमृत देशमुख यांनी अयशस्वी उद्योग हा यशस्वी कसा होऊ शकतो याचा कानमंत्र दिला.
कार्यशाळेचा समारोप करताना डाॅ शोभा सुपेकर यांनी भांडवल व व्यवस्थापकीय सहकार्यासाठी असणार्या सरकारी योजनांची माहिती दिली.
डाॅ मंजुषा कुलकर्णी, डाॅ प्रियांका भामरे, डाॅ पल्लवी निखारे व डाॅ मनीषा बेले यांनी सत्रांचे समन्वय केले. या कार्यक्रमाला ९० भावी उद्योजक उपस्थित होते.