बालेवाडी :
बालेवाडी येथील भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते पदाधिकारी प्रकाश दशरथ बालवडकर यांची भारतीय जनता पक्ष पुणे शहर चिटणीस पदी निवड करण्यात आली. कोथरूड मतदार संघाचे आमदार तथा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निवड जाहीर केली.
प्रकाश बालवडकर हे लहानपणापासून संघ स्वयंसेवक असून गेली तीस वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत. तसेच ते बालेवाडी गावचे उपसरपंच पदी देखील राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षात याआधी देखील त्यांनी विविध पदांवर कामे केली आहेत. याआधी ते भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस, अध्यक्ष कोथरूड मतदार संघ तसेच प्रभारी सहकार आघाडी भाजपा पुणे शहर या पदांवर देखील त्यांनी कामे केले आहेत.
प्रकाश बालवडकर यांच्यामार्फत वर्षभर बालेवाडी परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कबड्डी स्पर्धा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव ,शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, स्वातंत्र्य दिन ,प्रजासत्ताक दिन असे अनेक सामाजिक कार्यक्रम तसेच शासनाच्या विविध समाज उपयोगी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे असे अनेक समाज उपयोगी कामे बालवडकर यांच्यामार्फत करण्यात येतात.