औंध येथे संविधान पुस्तके वाटप…

0
slider_4552

औंध :

७५ व्या संविधान‌ महोत्सव दिनानिमित्त बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने औंध मध्ये भारताचे संविधान पुस्तके वाटप व प्रस्तावनेचे वाचन करून पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

औंध डि.पी.रोड. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने संविधानाच्या ७५ व्या महोत्सव दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रमेश ठोसर अध्यक्ष बहुजन उद्धारक सामाजिक संस्था यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयनंद पाटील यांचा भारताचे संविधान हे पुस्तक देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात सामुदायिकरित्या भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले, अजय निरवणे, पै.निलेश ठोसर, हिराबाई घोडेराव, शुभम कांबळे, किरण मोरे , गोकुळ ठोसर , स्वप्निल पालके, रवि भालेराव, छबूताई उदागे, भारती जगताप , छाया ठोसर व अंगणवाडी शिक्षिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

See also  पनामा पवनचक्की कंपनी विरोधात मनसेचे आमरण उपोषण सुरू