व्हॅल्यू ईंजिनीअरिंग विषय कौशल्य विकासासाठी महत्वाचा जो ईंडस्ट्री कनेक्ट देईल : रवींद्र पडवळ, टाटा मोटर्स

0
slider_4552

पुणे :

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड. ‘करिअर कट्टा’ यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा मध्ये दोन दिवसीय कार्यशाळा युवा विकास केंद्र धोरण व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या विषयांवर आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्धाटन रवींद्र पडवळ, टाटा मोटर्स यांच्या हस्ते झाले.

प्राचार्य डाॅ संजय खरात, डाॅ नितीन घोरपडे, डाॅ दीनानाथ पाटील, व श्री यशवंत शितोळे, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व समन्वयक करिअर कट्टा श्री शेखर गायकवाड ,उपमहासंचालक, यशदा हे उपस्थित होते.

तसेच या प्रसंगी श्री सचिन ईटकर, क्षेत्रीय संचालक, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ व डाॅ जयेंद्र लेकुरवाळे यांच्या हस्ते नोव्हेंबर विशेषांकात प्रकाशित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी उद्घाटन मेघा आदर्शे,उपायुक्त, वस्तु व सेवा कर यांच्या हस्ते झाले.

कार्यशाळेची सुरवात विद्या प्रतिष्ठानचे आर्ट्स काॅमर्स अँड सायन्स काॅलेज,विद्यानगरी, बारामती या काॅलेजचे प्रेझेंटेशन झाले. यानंतर श्री राजीव नंदकर,उपायुक्त, पुणे महानगरपालिका यांनी बेरोजगारीवर वक्तव्य केले.

श्री शेखर गायकवाड ,उपमहासंचालक, यशदा यांनी महाविद्यालयाने काही परंपरा ठेवाव्यात ज्या त्यांची ओळख बनतील असे सांगितले. या कार्यशाळेत प्राचार्य, जिल्हा प्रतिनिधी व विद्यार्थी असे १८० सहभागी होते.

पोलीस भरतीच्या उमेदवारांचा आहार विहार यावर डाॅ विधी सोमय्या यांचे प्राचीन संहिता गुरुकुल यावर प्रेझेंटेशन झाले.

पुढील ५ वर्षात सेंटर आँफ एक्सलन्स, आँनलाईन ट्रेनिंग, मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग, युथ डेव्हलपमेंट सेंटर, फुड व्हॅन, स्किल डेव्हलेपमेंट सेंटर या उपक्रमा अंतर्गत बारा कोटी पंचवीस हजार आठशे विद्यार्थी प्रशिक्षित करणे हे करिअर कट्टाचे उद्देश आहे.’ पालक प्रशासक ‘ ही संकल्पना राबवणे यात एक IAS प्रशासकीय अधिकारी + तीन अनिवासी भारतीय व व्यवसायिक हे सगळे एकत्र येऊन एक इंटर्नशीप प्लॅटफाॅर्म लाँच करणार आहे. यामधे परदेशामधे रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जातील. १० रिसोर्स सेंटर पुढील पाच वर्षासाठी ठरविले गेले. यात वेगवेगळ्या संकल्पनेचा पाठपुरावा घेतला गेला. स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढविण्यासाठी उपक्रम घेणे, मेन्सचा आभ्यासक्रम चार सेमिस्टर मधे घेता येईल का?यावर चर्चा करण्यात आली.तसेच युवा विकास केंद्र हे एका जिल्ह्यात एक असे असेल. त्यात २५ विद्यार्थ्यांची रहायची सोय असेल. ३५० विद्यार्थी बसेल असे सभागृह असेल. ही सुविधा स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी व सर्व विद्यार्थी वापरतील. यात अद्ययावत असे ग्रंथालय असेल. अशी माहिती मा श्री यशवंत शितोळे यांनी दिली.

See also  मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

कार्यक्रमाची प्रस्तावना डाॅ संजय खरात, प्राचार्य यांनी केले. निवेदन मा प्रभाकर घोडके, एच व्ही देसाई काॅलेज, आभार प्रदर्शन डाॅ ज्योती जोशी, माॅडर्न महाविद्यालय यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तरांनी झाला.

वक्तव्य :

रवी घाटे, भारतीय विकास ग्रुप, यांनी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे आहेत त्यांना आम्ही त्यांच्यव निवासी ठिकाणी नोकर्या देऊ असे सांगितले.

अँड राहुल वाघमोडे पाटील – “महाविद्यालयात असताना पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले तर वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल याबाबत मार्गदर्शन केले.सहज उपलब्ध होणारे पदार्थ खा ” असे त्यांनी सांगितले. रवी घाटे यांनी सांगितले की,”भारतीय विकास जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना आम्ही निवासी ठिकाणी रोजगार उपलब्ध करुन देऊ ”

दिनेश पवार – “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामधे लेखी परीक्षेत काय विषय असतात आणि त्यांचा आभ्यास कसा करायचा” हे सांगितले.

रवींद्र पडवळ – ” व्हॅल्यू इंजिनिअरिंग ही संकल्पना महाराष्ट्रातील सगळ्या महाविद्यालयात जर राबविली गेली तर, नविन शैक्षणिक धोरणामधे याचा विद्यार्थ्यांना खुप फायदा होईल. यामधे विद्यार्थी शेवटच्या सत्रामधे त्यांना ईंडस्ट्री कनेक्ट मिळेल. व त्याला आवश्यक कौशल्ये मिळतील. तसेच हा विषय मद्रास, दिल्ली, बैंगलोर व भुवनेश्वर इथे शिकवला जातो व त्यामुळे पदवी संपतानाच विद्यार्थी नोकरीला लागतो.”