पुणे :
पुणे एज्युकेशन फोरम व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ‘ भारतीय शिक्षण व्यवस्था – सद्यस्थिती व भविष्य’ याविषयावर विशेष चर्चासत्र प्रोग्रेसिव्ह ए्ज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाला मार्गदर्शन विनोदजी तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, यांचे लाभले.या प्रसंगी प्रमोदजी रावत,अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे, डाॅ प्रशांतजी साठे, राजेशजी पांडे, महामंत्री, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ गजानन र एकबोटे, सहकार्यवाह,डाॅ जोत्स्ना एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमख व उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे हे उपस्थित होते.
कार्याध्यक्ष डाॅ गजानन एकबोटे हे ३० वर्ष बिनविरोध पी ई सोसायटीमधे कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले यासाठी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले,” गजानन एकबोटे यांना खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी मानतो . ही संस्था ही विद्यापीठ बनेल अशी आशा मी गोयल सरांनी व्यक्त केली .” ऍड. एस.के .जैन यांनी आपले विचार व्यक्त करतांना भारतीय जगभरात आपल्या संस्कारांमुळे नावारूपाला आले आहेत असं निरीक्षण नोंदवले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे श्री गजानन एकबोटे यांनी भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेत सर्व महाविद्यालयांनी NAAC प्रमाणित गुणवत्ता चांगली ग्रेड प्राप्त करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रातील केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्राकडेही लक्ष असू द्यावी अशी सूचना श्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत गजानन एकबोटे यांनी व्यक्त करत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले.
भारतीय शिक्षण पद्धती आणि सद्यस्थिती यावर मार्गदर्शन करतांना श्री विनोद तावडे म्हणाले,” गेल्या दहा वर्षांत ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याबद्दल सर्वांनी बोललं पाहिजे. दहा वर्षांत मोदी सरकार चे ठळकपणे उपलब्धी सांगताना श्री तावडे म्हणाले, भारतची मानवी विकास निर्देशांकात सुधारणा झाली, आंतर राष्ट्रीय मांनकांनुसार महागाई वाढली नाही, 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली, पायाभूत विकासाची गती वाढली, त्याचबरोबर लाडकी बहीण यासारख्या योजना आणल्या, रस्त्याची, विमानतळाची संख्या वाढली तसेच व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी झाल्याचे सांगितले. हे सांगताना त्यांनी मोदी यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुधारणांचे राजकारण केल्याचे मत मांडले.
शिक्षणविषयक विचार व्यक्त करतांना खाजगी विद्यापीठांचे बील आणतांना आलेल्या अडथळ्यांचा आढावा घेतला. त्याचबरोबर शिक्षण विषयक बऱ्याच बाबींवर विचार केंद्रीय स्तरावर चालू असतो त्यातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. स्वायत्त संस्थांना जे योग्य वाटत त्यासाठी शासनाच्या आदेशाची वाट न बघता चांगल्या सुधारणा चालू कराव्यात. या धोरणातून शैक्षणिक संस्था अद्ययावत होतील आणि Stomach अवलंबित्व कमी होत जाईल असं भाष्य श्री विनोद तावडे यांनी केलं
सुत्रसंचलन डाॅ निवेदिता एकबोटे ,प्रास्ताविक डाॅ संजय चाकणे, टी जे काॅलेज, खडकी तर कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्राचार्य डाॅ. देवीदास वायदंडे यांच्या वतीने करण्यात आला .ईशस्तवन स्वाती पटवर्धन यांनी केले.
महाराष्ट्र गीताने सुरवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अजीव सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शिक्षणक्षेत्रातील विविध मान्यवर, संस्थाचालक, प्राचार्य उपस्थित होते.