कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मविआ चे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा प्रतिसाद

0
slider_4552

कोथरूड :

घरातल्या माणसाच्या आम्ही पाठीशी आहोत… लहानपणापासून पाहतो तुमच्यातील जिद्द तीच आहे… काका आता विकासाला गती देण्याची वेळ आली… अशा प्रतिक्रिया कर्वेनगर येथे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधताना आल्या.

ही निवडणूक माझ्या एकट्याची नाही तर तुम्हा सर्वांची असून, तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल,असा विश्वासही मोकाटे यांनी व्यक्त केला. वारजे जकातनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुष्पहार अर्पण करून कर्वेनगर परिसरातील पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, शहर अध्यक्ष स्वश्षिल दुधाने, विजय खळदकर, जगदीश दिघे, नंदू घाटे, वैशाली दिघे, पल्लवी नागपुरे, गोविंद थरकुडे, ॲड.शिवाजी भोईटे यासह पदाधिकारी आणिनागरिक सहभागी झाले.

यावेळी गावकऱ्यासह नागरिकांच्या गाठी-भेटी घेताना त्यांच्या चेह्यावरील आनंद आणि आपलेपणातून ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. यावेळी काही महिलांनी वाढती महागाई, बेरोजगारी यासह विविध समस्यांचा पाढा वाचला.भाजीपाला घ्यायला गेलो, तर ८० ते १०० रुपये किलो दराने विकला जातो. मात्र, त्याच तुलनेत शेतकन्याला भाव मिळत नाही. धान्याच्या किंमतीही वाढल्या, असा परिस्थितीत कुटुंबांचा गाढा चालवायचा कसा अशी व्यथा महिलांनी मोकाटे यांच्याकडे मांडली. नेतेमंडळी महागाईवर बोलण्यापेक्षा एकमेकांवर टीका करत आहेत. या वर “शिवसेना-महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम महागाई आटोक्यात आणण्यासाठी पाठपुरावा करू, असे अश्वासन मोकाटे यांनी दिले.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले सरप्राईज, सुनिल चांदेरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष