पुणे :
पुणे शहर पोलिस आयुक्तालया अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन सात पोलिस ठाण्यांच्या कामकाजाला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे.
गृहविभागाने गुरुवारी रात्री याबाबतचे आदेश काढले आहेत. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यलायात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत या पोलिस ठाण्यांचे दुपारी दोन वाजता उद्धाटन होणार आहे.
शहराचा वाढता विस्तार,लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी,नागरिकांची सुरक्षितता, बंदोबस्त,महत्वाच्या व्यक्तींचे दौरे आदी बाबींमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण वाढत होता. तसेच काही पोलिस ठाण्यांची हद्द मोठी असल्यामुळे कामकाजात निर्माण होणाऱ्या अडच्णींचा विचार करून या नवीन 7 पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
शुक्रवार पासून ही पोलिस ठाणी सुरू होणार आहेत.त्यासाठी 816 मनुष्यबळ देखील मंजूर झाले आहे.
तसेच, पायाभूत सोई- सुविधांसाठी 59 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. दरम्यान,नवीन सात पोलिस ठाण्यांमुळे शहरातील पोलिस ठाणी 39 होणार आहेत. आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी नवीन पोलीस ठाण्याची नावे आहेत.